Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal टिम ई सकाळ
महाराष्ट्र

''शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही''

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवभोजन केंद्रावरील (Shivbhojan kendra) गैरप्रकार खपवून घेणार नाही. शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांना प्रथम वेळी कारणे दाखवा नोटीस द्या दुसऱ्यांदा देखील गैरप्रकार केल्यास मोठया रकमेचा दंड करावा आणि पुन्हा तिसऱ्यांदा गैरप्रकार आढळल्यास सदर आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले.

गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई करा - भुजबळ

श्री. भुजबळ म्हणाले, राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. शिवभोजन केंद्र देताना दिव्यांग तसेच महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाते, या माध्यमातून अधिकाधिक गरजू महिलांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे शासकीय विश्रामगह येथे श्री. भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, वैधमापन विभागाच्या सहनियंत्रक सीमा बैस, परिमंडल अधिकारी गिरीष तावले, प्रशांत खताळ, चांगदेव नागरगोजे आदी उपस्थित होते .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT