mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पवित्र पोर्टलवरुनच १५ हजार शिक्षकांची भरती; पोर्टलसाठी कंपनीला ६९ लाख रुपये; जानेवारीअखेर अपलोड होणार जाहिराती, पुढचे टप्पे कसे...

राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरु झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसीत करण्याचे काम तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरु झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसीत करण्याचे काम तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. जानेवारीअखेर रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील आणि जूनअखेर भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून या वर्गांची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे. जानेवारीअखेर त्या पुस्तकांची छपाई सुरु होईल. मराठी शाळांमध्ये आता ‘सीबीएसई’प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत.

नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविला जाईल, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु झाली आहे. जानेवारीअखेर जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शासन आदेशानुसार...

पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कंपनीला शासनाकडून ६८ लाख ८४ हजार १२० रुपये दिले जाणार आहेत.

शिक्षक भरतीची स्थिती

  • पहिल्या टप्प्यातील घोषणा

  • ३०,०००

  • पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध

  • २१,६००

  • शिक्षक भरती झाली

  • १९,०००

  • दुसऱ्या टप्प्यातील भरती

  • १५,००० पर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angkrish Raghuvanshi: आयपीएल सामन्यात कोणत्या नियमामुळे अंगकृश रघुवंशी बाद झाला? ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड म्हणजे नेमकं काय? वाचा...

दगडाने मारहाण, चाकू, फाइटर, वस्तराने शरीरावर वार, तरुणाला निर्घृणपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

LSG vs KKR Live: W,W,W,W,W! मोहसिन खानने कोलकाताचा निम्मा संघ तंबूत पाठवला; बुमराहच्या पंक्तीत स्थान, दोन मोठे विक्रम

धडा वेगळे शीर करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अघोरी पूजेतून नरबळी असल्याची शंका

IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video

SCROLL FOR NEXT