श्री विठ्ठल

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

कोट्यवधी भक्तांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची कीर्ती आता जगभर पसरू लागली आहे. विदेशातील भक्तांनाही विठुरायाच्या महापूजेची भुरळ पडू लागली आहे. देवाच्या नित्यपूजेसह विविध पूजांसाठी सातासमुद्रापलीकडे राहणाऱ्या अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा अनेक देशांतील परदेशी भाविकांनी मंदिर समितीकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.

तात्या लांडगे

पंढरपूर : कोट्यवधी भक्तांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची कीर्ती आता जगभर पसरू लागली आहे. विदेशातील भक्तांनाही विठुरायाच्या महापूजेची भुरळ पडू लागली आहे. देवाच्या नित्यपूजेसह विविध पूजांसाठी सातासमुद्रापलीकडे राहणाऱ्या अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा अनेक देशांतील परदेशी भाविकांनी मंदिर समितीकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच येत्या चार महिन्यांमध्ये होणाऱ्या या विविध पूजांच्या माध्यमातून मंदिर समितीला सुमारे ९० लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्नही मिळणार आहे.

शिर्डी, तिरुपती बालाजीनंतर आता पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी परदेशी भाविकांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी (ता. २५) अवघ्या पाच ते सात मिनिटांत देवाच्या सर्व पूजांची नोंदणी पारदर्शकपणे पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणीची दैनंदिन नित्यपूजा, पाद्यपूजा आणि तुळशी अर्चना पूजा केली जाते. या पूजा मंदिर समितीने भाविकांसाठी देणगीमूल्याच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून या पूजांसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळे मंदिर समितीने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. दर चार महिन्यांनी विविध पूजांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांसाठी बुधवारी (ता. २५) पहिल्याच दिवशी अवघ्या काही मिनिटांत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चना पूजांची नोंदणी पूर्ण झाली. यामध्ये देशासह अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील अनेक भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा ऑनलाइन नोंदणी केली आहे.

तब्बल २० देशांतील भाविकांची संकेतस्थळाला भेट

तब्बल २० देशांतील भाविकांनी पूजा नोंदणी करण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची अवघ्या काही मिनिटांत १४८ पूजांची नोंदणी पूर्ण झाली. पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला सुमारे ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचेही मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना निवडता येतील 300 महाविद्यालये! प्रवेशासाठी लागणार ‘ही’ कागदपत्रे, जूनमध्येच प्रवेश नोंदणी, 4 प्रवेश फेऱ्या

Panchang 8 June 2026 : आजचे पंचांग! कालाष्टमी, मृग नक्षत्र प्रवेश आणि शुभ योग

साधे पोहे विसरा! वजन कमी करणाऱ्यांचा नवा फेव्हरेट ठरतोय हा 'फायबरयुक्त चिला'; जाणून घ्या सोपी रेसिपी

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंगशिवाय खते नाहीतच! आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती, खतांची पोती, दुकानदार निवडावा लागणार; टोकनद्वारे 3 दिवसांत मिळेल खत

SCROLL FOR NEXT