Ujani Dam Water Sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांना दिलासा! मुसळधार पावसामुळे उजनी धरणात वाढले दीड टीएमसी पाणी; ६३०० क्युसेक विसर्गाने येत आहे धरणात पाणी

तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मूसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात या पावसामुळे दीड टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरण परिसरातूनच पाण्याची आवक असून सध्या साडेसहा हजार क्युसेक पाणी धरणात येत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मूसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात या पावसामुळे दीड टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरण परिसरातूनच पाण्याची आवक असून सध्या साडेसहा हजार क्युसेक पाणी धरणात येत आहे.

भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर, नाझरे या धरणांमधील पाणीसाठा अद्याप सुधारलेला नाही. यातील खडवासला, वडीवळे, येडगाव, आंद्रा, पवना ही धरणे वगळता उर्वरित सर्वच धरणांमधील पाणीसाठा २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. पिंपळगाव जोगे, घोड या धरणांनी तळ गाठला आहे.

उजनी धरणाच्या वरील बाजूला असलेली ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय उजनी धरणात पाणी येत नाही. उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील बंडगार्डन, दौंड येथून विसर्ग येतो. सध्या मुळसधार पाऊस पडत असतानाही तेथून विसर्ग उजनीत येत नाही. दुष्काळामुळे भीमा खोऱ्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे. उजनी धरणात सध्या धरण परिसरातून विसर्ग जमा होत असल्याने दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

उजनी धरणात ३३ टीएमसी पाणी

७ जून रोजी धरणातील पाणीसाठा उणे ६० टक्के झाला होता. आता तीन दिवसांत धरणात साधारणत: दीड टीएमसी पाणी वाढल्याने धरणातील साठा सद्य:स्थितीत उणे ५७.५१ टक्क्यांवर आला आहे. धरणात सध्या ३३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा आहे. मुसळधार पावसामुळे आता परिसरातून मोठा विसर्ग धरणात जमा होत असल्याने धरणातील साठ्यात आणखी वाढ होईल.

यंदा धरणातील साठा सर्वात निच्चांकी

उजनी धरणाची निर्मिती झाल्यापासून धरण उन्हाळ्यात कधीच उणे ६० टक्के झाले नव्हते. यावर्षी धरणातील साठा उणे ६० टक्के झाल्याने शेतकऱ्यांना कडक उन्हाळ्यात अतिरिक्त आवर्तन सोडता आले नाही. आता धरणात पावसाचे पाणी जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा काय बदल झाला! अर्शदीपला मिळाली का संधी?

Namo Tourism Centre Controversy : राज ठाकरेंचा 'नमो टुरिझम सेंटर' तोडण्याचा इशारा, शिंदे गटानं दिलं चोख प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

MPSC Result 2024: राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामकणे राज्यात पहिला

SCROLL FOR NEXT