Prasad Lad Esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रसाद लाड यांना दिलासा! सोमय्या, दरेकरांपाठोपाठ आर्थिक गुन्हे शाखेकडून आणखी एक तपास बंद

प्रसाद लाड यांच्याविरुद्ध खटला पुढे नेण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही

सकाळ डिजिटल टीम

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्याचा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास आता बंद करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतरचे तिसरे भाजप नेते आहेत. यामुळे भाजप पक्षासाठी सरकारी यंत्रणा काम करत आहे का असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे.

प्रसाद लाड यांच्यावर 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात त्यांच्यावर 2014 मध्ये मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता.

ईओडब्ल्युने आपल्या सी समरी रिपोर्टमध्ये नमूद केले आहे, प्रसाद लाड यांच्याविरुद्ध खटला पुढे नेण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही, असा दावा रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. यामुळे प्रसाद लाड यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT