Jayant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : एवढा उद्दामपणा बरा नाही,पाटील;उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनावले

विधानसभा सभागृहात अर्थसंकल्पी चर्चेला त्या त्या खात्यांचे मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. त्यावरून मोठा गदारोळ झाला. मंत्री गिरीश महाजन आणि वडेट्टीवार यांच्यात बाचाबाची झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा सभागृहात अर्थसंकल्पी चर्चेला त्या त्या खात्यांचे मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. त्यावरून मोठा गदारोळ झाला. मंत्री गिरीश महाजन आणि वडेट्टीवार यांच्यात बाचाबाची झाली. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागण्या मंजुरीला टाकण्याचे निवेदन करताच जयंत पाटील यांनी त्याला हरकत घेत, एवढा उद्दामपणा बरा नाही, असे थेट सुनावल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.

विधानसभेत अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मान्यतेवर चर्चा आणि मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. यात महसूल, आरोग्य, महिला बालकल्याण व ग्रामविकास या विभागांचा समावेश होता. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार व एक-दोन मंत्री वगळता कोणी उपस्थित नव्हते. वास्तविक इतर मंत्र्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मंत्री सभागृहात नसल्याने वडेट्टीवार यांनी त्याला आक्षेप घेत सरकारची लाज काढली. यावरून गिरीश महाजन यांनी वडेट्टीवार यांना सुनावत टाइमपास सुरू असल्याची टीका केली. यावरून वाद वाढत गेला.

अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना बोलण्याची विनंती केली. मात्र वाद वाढतच गेल्याने पवार म्हणाले, ‘‘विरोधक जे बोलत आहेत, जे काही सुरू आहे यावरून त्यांना अनुदान मागण्यांवर काही बोलायचे नाही, असे दिसत आहे. त्यामुळे आजच्या मागण्या मी मंजुरीसाठी टाकत असल्याचे सांगितले. मात्र त्याला जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला.

नरमाईची भूमिका

जयंत पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नरमाईची भूमिका घेत बाजू मांडली. ते म्हणाले, ‘‘सदस्यांच्या भावना ऐकून आम्ही लगेच सभागृहात आलो. वरिष्ठ सभागृहात प्रश्न उपस्थित झाल्याने काही मंत्री तिकडे उत्तर देण्यासाठी गेले आहेत. त्या मंत्र्यांच्या विभागाबाबत जे प्रश्न उपस्थित केले आहेत, ते मी नोंदवून घेत आहे. त्यामुळे चर्चा करण्याची मी विनंती केली.’’ यात बराच वेळ गेल्याने मी मागण्या मांडू का, अशी विचारणा केल्याचे सांगत पुन्हा विरोधी पक्षांना बोलण्याची विनंती करून त्यांनी वादावर पडदा टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT