Retail inflation breaches RBI target in October now at a 16-month high of 4.62%
Retail inflation breaches RBI target in October now at a 16-month high of 4.62% 
महाराष्ट्र

जनसामान्यांना दणकाच; देशात महागाई वाढल्याचे सिद्ध

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशातील किरकोळ महागाई दर ऑक्टोबर महिन्यात वाढून 4.62 टक्क्यांवर पोचला आहे. सप्टेंबर महिन्यात देशातील किरकोळ महागाई दर 3.99 टक्क्यांवर होता. रिझर्व्ह बॅंकेने ठेवलेल्या 4 टक्क्यांच्या उद्दिष्टाला ओलांडत किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. मुख्य वस्तूंच्या (अन्नधान्य आणि खाद्यतेल वगळता) महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 3.5 टक्क्यांवर होता. सप्टेंबरमध्ये हा दर 4 टक्के इतका होता. सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या अन्नधान्यांच्या किंमतीत मात्र सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्य आणि खाद्य पदार्थांच्या किंमतीत 7.89 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रोहित पवारांमुळे अंकिता पाटील, दत्ता झुरंगेंचा झेडपीचा मार्ग मोकळा!

सप्टेंबरमध्ये हीच वाढ 5.11 टक्क्यांनी झाली होती. कडधान्ये आणि तत्सम उत्पादनांचा महागाई दर 1.66 टक्क्यांवरून 2.16 टक्क्यांवर पोचला आहे. तर भाजीपाल्यासाठीचा महागाई दर ऑक्टोबरमध्ये 26 टक्क्यांवर पोचला आहे. सप्टेंबरमध्ये हाच दर 15.4 टक्क्यांवर होता.

राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीबाबत अशोक चव्हाण म्हणाले...

डाळी आणि तत्सम उत्पादनांशी निगडीत महागाई दर सप्टेंबरमध्ये 8.4 टक्के होता तो ऑक्टोबरमध्ये 11.72 टक्क्यांवर पोचला आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या मंदावलेली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर एप्रिल ते जून 2019 या कालावधीत 5 टक्क्यांवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

SCROLL FOR NEXT