robbery Sakal
महाराष्ट्र बातम्या

पांगरेजवळील वडशिवणे शिवारातील वस्तीवर दरोडेखोरांचा थरार! दागिने हिसकावताना महिलेचा तुटला कान, पतीवर चाकूने वार; साडेचार लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार

कांतिलाल यांच्या नाकावर, गालावर, डोक्यात चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांतिलालला सोडून चोरट्यांनी त्यांच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील गंठण, बोरमाळ काढून घेतली. कानातील झुबे काढून घेताना चोरट्यांनी हिसका मारला. त्यात त्यांचा कान तुटला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : घरातील सगळे गाढ झोपेत असताना सोमवारी (ता. २) मध्यरात्री दीडच्या सुमारास चौघेजण आत शिरले. त्यांनी झोपेतून जागे झालेल्या कांतिलाल मणेरी (रा. पांगरे, वडशिवणे शिवारात, ता. करमाळा) यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली व गळ्यातील गंठण, कर्णफुले, बोरमाळ, अंगठी व रोकड, असा एकूण चार लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शकील कांतिलाल मणेरी यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पांगरी गावाजवळील वडशिवणे शिवारात वस्तीवर राहणारे कांतिलाल मणेरी, त्यांची पत्नी व मुलगा शकील हे तिघेजण सोमवारी जेवण करून झोपले होते. घराचे बांधकाम सुरू असल्याने ते पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते. झोपताना त्यांनी घराचा दरवाजा पुढे केला होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास चौघेजण दरवाजा ढकलून घरात शिरले. त्यांनी कांतिलाल यांच्या नाकावर, गालावर, डोक्यात चाकूने वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांतिलालला सोडून चोरट्यांनी त्यांच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील गंठण, बोरमाळ काढून घेतली. कानातील झुबे काढून घेताना चोरट्यांनी हिसका मारला. त्यात त्यांचा कान तुटला आहे. चोरट्यांनी शकीलला देखील मारहाण केली. गावापासून दूर अंतरावर वस्ती असल्याने त्यांच्या ओरडण्याचा आवाजही कोणाला आला नाही. चोरी करून चोरटे निघून गेले. त्यानंतर शकीलने वडिलांना टेंभुर्णीतील रुग्णालयात दाखल केले. कांतिलाल यांच्यावर उपचार सुरू असून सध्या ते आयसीयूमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मदने तपास करीत आहेत.

घराच्या बांधकामासाठी साठविले होते पैसे

घराचे बांधकाम सुरू असल्याने कांतिलाल मणेरी यांनी थोडे थोडे करून तीन लाख ४४ हजार रुपये जमविले होते. त्यांना शेतातील केळीचेही पैसे आले होते. पाऊस सुरू असल्याने त्यांच्या घराचे बांधकाम थांबले होते. आता पाऊस उघडल्याने स्लॅबचे साहित्य आणण्याचे त्यांचे नियोजन होते. पण, चोरट्याने त्यांच्या घरातील दागिने व रोकड चोरून नेली आहे.

चौघेही बोलत होते मराठीतून

चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चौघांकडे धारदार शस्त्रे होती. अर्धा तास हा थरार सुरू होता. दागिने घेऊन त्यांनी घरातील कपाटात ठेवलेली रोकड चोरून नेली. त्यावेळी ते चौघेही एकमेकांना मराठीतून बोलत होते. त्यांनी तोंडाला काहीही बांधलेले नव्हते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यांना पुन्हा पाहिले तर मी ओळखू शकतो, असे फिर्यादी शकीलने पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर जीवघेणा क्षण! पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवासी, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Latest Maharashtra News Updates : 'महादेवी हत्तीण' परत मिळविण्यासाठी 'स्वाभिमानी'ची आज पदयात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा

Pune News : प्रश्नांच्या पाठपुराव्याचा निर्धार, ‘सकाळ’तर्फे आमदारांची बैठक; अधिवेशनातील कामकाजावर चर्चा

'पश्चिम बंगालमध्ये तब्बल 1 कोटी बनावट मतदार, रोहिंग्या-बांगलादेशी मतदारांची नावे यादीतून काढून टाका'; SIR वरुन वादंग

Sunday Breakfast Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ज्वारी आणि दुधी भोपळ्याचे अप्पे, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT