Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar Latest Update : काका पुतण्यांमध्ये अशी झाली लंच पे चर्चा! अजितदादांच्या भेटीचे गूढ रोहित पवारांनी उलगडले

रोहित पवारांनी केली चक्क अजित पवारांसोबत लंच पे चर्चा, अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra Monsoon Session : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात अर्ध्या तास या दोघांमध्ये चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमागे मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी या भेटीबाबत माहिती दिली आहे. बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्याकडे तीन चार सामूहिक विषय घेऊन गेलो होतो. सरकारी परीक्षांची 1000 रुपये, 900 फी घेतली जात आहे. राजस्थान पॅटर्न नुसार 600 रुपये घ्यावी, यासंदर्भातील अजित पवार यांच्याकडे पत्र दिलं आहे.

मविआचा उपमुख्यमंत्री असताना MPSC सदस्य वाढवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. याबाबत आता आढावा बैठक घ्यावी अशी विनंती यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांना केली आहे. काही भरत्या राहिल्या आहेत, त्या लवकर करा. माझ्या मतदारसंघातील विषय, पीक विमा योजनेसाठी वेळ वाढवा तसेच माझ्या मतदारसंघातील MIDC विषय आहे, तो निकाली लावण्यास सांगितलं अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

कर्जत -जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा रोहित पवार यांनी सभागृहात मांडला होता. तर यासंदर्भात त्यांनी विधानभवनाच्या आवारात पावसात एकट्याने बसत आंदोलनही केलं होतं. तर या कारणासाठी रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

अजित पवार यांच्यासह ८ आमदांरानी शिवसेना-भाजपला समर्थन देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली. त्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर या फुटीनंतर आज रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अजित पवार आणि रोहित पवार यांनी दालनात चर्चेनंतर एकत्र जेवण केल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

SCROLL FOR NEXT