Rohit Pawar on BJP sakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar on BJP: "एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायला भाजपाला ..."; रोहित पवार यांची खोचक टीका

रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली

Sandip Kapde

Rohit Pawar on BJP:  राहुल गांधींवर झालेल्या कारवाई विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी एकवटली आहे. शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सहभागी झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, सामान्य लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र राज्यात खुर्चीसाठी भांडण चालू आहे.एक वर्ष झाले शिंदे यांच्या लोकांना आणखीन मंत्रिपद मिळाले नाही.

अजित पवार गटात देखील अस्वस्था आहे. यावर रोहीत पवार म्हणाले. जे सांगितले आहे ते मिळत नाही म्हणून हा तिढा निर्माण झाला आहे.

भाजपमधील लोकनेते ते टिकू देत नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करायला भाजपाला एक वर्ष लागली. महाराष्ट्रामधील सह्याद्री दिल्लीसमोर कधी झुकला नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्यासोबत आहे, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

वळसे पाटलांवर रोहित पवार म्हणाले, पाणी विषय हास्यास्पद आहे. जुन्नरमध्ये जाऊन मी वळसे पाटील यांना उत्तर देईल . मला दहा वर्षात निष्ठा कळाली त्यामुळे त्यांनी कुणाचे वय कोणी काढू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT