Rohit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

हातात छत्री तरीही पावसात भिजले रोहित पवार; फोटो व्हायरल

रोहित पवार यांचा भरपावसात भिजत असलेला फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

धनश्री ओतारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांवेळी भरपावसात भिजून साताऱ्यातील सभेला संबोधित केले होते. याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असते. दरम्यान, आता रोहित पवार यांचाही भरपावसात भिजत असलेला एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये त्यांच्या हातात छत्री दिसत असल्याने हातात छत्री तरीही पावसात का भिजले रोहित पवार? असा सवाल उपस्थित होत आहे.(Rohit Pawar rain photo viral on social media)

रोहित पवार काल सातारा दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी, माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती. पण चर्चा त्यांच्या फोटोशुटची रंगली.

दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथे फोटोही काढले. या दरम्यान, रिमझिम पाऊस सुरू होता.या फोटोमध्ये त्यांच्यासमेवत त्यांचे वडिलही दिसून येतात. वडिलांनी डोक्यावर छत्री घेतल्याचेही फोटोत दिसते. पण रोहित पवार भिजत राहिले. तर एका फोटोत ते हातात छत्री असताना पावसात भिजताना दिसून आले.

सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रा करत आहेत. या दरम्यान त्यांनीही पावसात भिजून सभा घेतल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांना छत्री ऑफर करण्यात आली होती. मात्र, त्यांनीही छत्री नाकारल्याचं पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT