rohit pawar to maharashtra polititians on vedanta foxconn project went to gujarat
rohit pawar to maharashtra polititians on vedanta foxconn project went to gujarat  esakal
महाराष्ट्र

Vedanta-Foxconn : महाराष्ट्रात जागा निश्चित, गुजरातेत शोध सुरू; रोहित पवारांनी वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण तापलं होतं. या प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, वेदांता-फॉक्सकॉनवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही, असे म्हटले आहे.

माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी फायनल झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी फायनल झाली असताना , सरकार बदललं. कदाचित या सरकारने देखील प्रयत्न केलेले असतील, पण ५ सप्टेंबर रोजी जेव्हा अग्रवाल हे पंतप्रधानांना भेटले आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलायला सुरुवात झाली, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

गुजरातमध्ये मोठे दोन तीन प्रोजेक्ट आले होते, तेव्हा फॉक्सकॉनला देण्यात आलेली जमीन त्यांना देण्यात आली होती, ती त्यांनी घेतली नाही. परंतु त्यांनी ती जागा घेतली नाही व ते प्रोजेक्ट आता गुजरातला राहिले नाहीत. त्यामुळे फॉक्सकॉनचं अजून गुजरातमध्ये निश्चित झालेलं नसेल, तर तो संपूर्ण प्रोजेक्ट महाराष्ट्रात कसा येईल यासाठी आताच्या सरकारमधील नेत्यांनी प्रयत्न करावेत, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी याबाबतीत ट्विट देखील केले आहे, "Vedanta-Foxconn ने महाराष्ट्रात जागा निश्चिती केली असतानाही राजकीय उदासिनतेमुळे गुजरातमध्ये गेलेला हा उद्योग अजूनही तिकडं जागेचा शोध घेतोय…हे म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही त्याकडं दुर्लक्ष करुन दुसरीकडं जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा जमा करण्यासारखा प्रकार आहे."

"वेदांता-फॉक्सकॉनवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळं डबल इंजिनचा प्रचार करणाऱ्या राज्य सरकारने हा उद्योग महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडं आग्रह धरावा, ही विनंती!" असेही ते म्हणले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT