Ramdas Athwale 
महाराष्ट्र बातम्या

... तर पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धुसर : आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात अल्प बहुमतातलं सरकार बनलं आणि ते पडलं तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल आणि पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धुसर असल्याचे भाकित आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.

राज्यात सत्ता स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचवर प्रतिक्रिया देताना आठवले माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेने सोबत चर्चा व्हायला हवी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता नसली तरी, त्यांना उममुख्यमंञीपद मिळू शकते. तसेच मंत्रिमंडळात अर्ध्या जागा, केंद्रात आणखी एक मंत्री पद आणि राज्यात चांगली खाती शिवसेनेला मिळू शकतात असा अंदाजही वर्तविला आहे.

राज्यात सत्ता स्थापण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्यापेक्षा भाजप शिवसेनेला राज्यातील जनतेने कौल दिला आहे, त्यामुळे त्यांनीच सत्ता स्थापली पाहिजे अशी आग्रहाची भूमिका त्यांनी मांडली आहे.

राज्यात पुन्हा निवडणुकांची परिस्थिती उदभवल्यास भाजप शिवसेनेचे मोठे नुकसान होईल. पुन्हा निवडणुका झाल्यास महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धूसर असल्याचे भाकितही आठवलेंनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT