RTI Maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

RTI Maharashtra : माहिती अधिकाराचे पाठीराखेच प्रतिनियुक्तीवर!‘आरटीआय’चे लाखावर अर्ज प्रलंबित ,आयोगाच्या कार्यालयात निम्मी पदे रिक्त

सर्वसामान्यांचा अधिकार असलेल्या माहिती अधिकार अर्थात ‘आरटीआय’ कायद्याची बूज राखण्याची जबाबदारी माहिती आयोगावर आहे

सकाळ वृत्तसेवा

-अविनाश साबापुरे

यवतमाळ : सर्वसामान्यांचा अधिकार असलेल्या माहिती अधिकार अर्थात ‘आरटीआय’ कायद्याची बूज राखण्याची जबाबदारी माहिती आयोगावर आहे. मात्र राज्याच्या माहिती आयोगातच आयुक्तांसह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची निम्मी पदे रिक्त असून प्रतिनियुक्त्यांवर कसाबसा कारभार हाकला जात आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्य माहिती आयोगात आयुक्त, सचिव, उपसचिव, अवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी, सहाय्यक (विधी), सहायक कक्ष अधिकारी आदी ६५ पदे मंजूर आहेत. त्यातील ३४ पदे रिक्त असून कार्यरत असलेले ३१ अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत. गंभीर म्हणजे, आयुक्तांच्या ८ पदांपैकी तब्बल सहा आयुक्त प्रतिनियुक्तीवर कारभार पाहात आहेत. तर दोन पदे रिक्त आहेत. सचिवाचे एकच पद मंजूर असून तेही प्रतिनियुक्तीवर आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने त्यांनी कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे.

गेल्या दोन महिन्यांचा अंदाज घेतल्यास ‘आरटीआय’चे लाखावर अर्ज सुनावणीविना प्रलंबित आहेत. आयोगात पदे रिक्त असल्याने कामाचा ताण आहे. एक-दोन महिन्यात तीन माहिती आयुक्त निवृत्त होणार असल्याचे समजते. ही पदे लवकर भरावीत.

- विशाल ठाकरे,

माहिती अधिकार कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT