Rupali Thombare News esakal
महाराष्ट्र बातम्या

Rupali Thombare Video : गोप्या बोल म्हटलं की पवार पवार करतो; रुपाली ठोंबरेंचं पडळकरांना सणसणीत उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मी पवार कुटुंबाला पुरुन उरलो आहे, असं विधान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जशास तसं उत्तर दिलं. रुपाली ठोंबरे यांनी आज पडळकरांवर कडक शब्दांमध्ये टीकास्र सोडलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही पडळकर यांनी अनेकदा वादग्रस्त टीका केली आहे. त्यातच आज पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर बोलताना आमदार पडळकर यांनी अजित पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. पडळकर म्हणाले की, संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही, त्यांची कदाचित सुंता झाली असती, माध्यमांनी जाऊन पहा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबले म्हणाल्या की, भाजपने पडळकर यांना खुळखुळा आणून ठेवला आहे. गोप्या बोल म्हणलं की गोप्या पवार पवार करतो. भाजपने गोपीचंद पडळकर यांना तुकडा टाकलेला आहे.. फक्त पवार कुटुंबिय यांच्यावरच बोलायचं. पवार साहेबांच्या परिवारावर भुंकण्यासाठी पडळकर यांना ठेवले आहे, अशी टीका ठोंबरे यांनी आज केली.

राजे उमाजी नाईक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते, असं अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर भाजपने आक्रमक पावित्रा घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT