Sachin Sawant on RSS google
महाराष्ट्र बातम्या

'तुमची भाषा मनुवादी शिकवणीची, म्हणूनच RSS मध्ये स्त्रीया नाहीत'

'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेच्या धर्तीवरते आहे, सावतांनी टोचले कान

सकाळ डिजिटल टीम

'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेच्या धर्तीवरते आहे, सावतांनी टोचले कान

ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण तापलं असताना भाजपाचे प्रदेसाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार सुळेंवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली असल्यानं महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, आता या वादात कॉंग्रेसच्या सचिन सावंत यांनी उडी घेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. (Sachin Sawant on RSS)

यासंदर्भात सावंत यांनी एक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, चंद्रकांत पाटील यांची भाषा मनुवादी संघाच्या शिकवणीची आहे. स्त्री जीवन ‘चूल आणि मूल’ इतपतच. ‘१० मूले, ४ मुले काढा’उगीच म्हणत नाहीत. तसेच स्त्री संपर्क विषसमान! म्हणूनच संघ कार्यकारिणीत स्त्रीया नाहीत. ‘मसणात जा’ म्हणणे केतकी चितळेच्या धर्तीवर आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.” अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील?

मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल केंद्र सरकारला विचारणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर पाटील म्हणाले की, कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी फटकारलं, म्हणाल्या..

कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्या म्हणातात, चंद्रकांत दादा, आता वेळ अशी आलीये की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांंच्या कान्स संदर्भावरून दिला आहे. काळ बदलला आहे, महिलांना कमी लेखू नका. महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणार ही नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विद्या चव्हाण यांचा चंद्रकांत पाटलांना टोमणा..

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनीही आता चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात चव्हाण यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. त्या म्हणतात, बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते. चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT