anil deshmukh devendra fadanvis 
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंगांच्या खळबळजनक पत्रावर फडणवीसांची जळजळीत प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी त्यांच्याकडे सोपवलेला पदभार न स्वीकारता रजेवर गेले आहेत. दरम्यान, आता त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. याबाबत परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. यामध्ये सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होतं असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. यावरून आता पुन्हा एकदा विरोधकांकडून गृहमंत्र्यांवर टीका केली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हे पत्र फक्त खळबळजनक नाही तर धक्कादायक असं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याच अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांबाबत असं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. या परिस्थितीत गृहमंत्री त्यांच्या पदावर राहू शकत नाहीत. आता त्यांनी राजीनामा द्यायला हवा.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना असं म्हटलं की, स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांची धडपड सुरु आहे. परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे. 

काय म्हणाले फडणवीस -

  • परमबीर सिंग यांनी पत्रात चॅटबाबत केलेला उल्लेख हा थेट पुरावा आहे.
  • चॅटमधून अशा प्रकारे पैशाची मागणी झाल्याचं दिसतं. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.
  • महाराष्ट्राच्या पोलिस विभागातील ही प्रकरणं उघडकीस येतात. यातून पोलिस दलाचं खच्चीकरण होताना दिसतंय.
  • दुर्दैवाने इतक्या वाईट पद्धतीने ही परिस्थिती समोर आली आहे आणि या परिस्थितीत गृहमंत्री त्यांच्या पदावर राहू शकत नाहीत. आता त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
  • परमबीर सिंग यांनी केलेल्या आऱोपांनंतर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. जोपर्यंत दूध का दूध पानी का पानी होत नाही तोपर्यंत नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. 
  • पोलिस दलाला बदनाम करणारा प्रकार असून याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. 
  • गृहमंत्री पदावर असताना चौकशी कशी होऊ शकते? कोणी साध्या व्यक्तीने नाही तर राज्यातील एका अधिकाऱ्याने केलेला आरोप आहे. त्यामुळे याची तात्काळ चौकशी व्हायलाच हवी. 
  • गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले असले तरी पत्रात जोडलेले चॅट हा पुरावा आहे. असा पुरावा असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. 
  • गृहमंत्र्यांनी नैतिक भूमिका घ्यायला हवी. यावर बोलण्याप्रमाणेच तात्काळ कृती करायला पाहिजे.
  • परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याचं म्हटलं जातंय. असं असेल तर तात्काळ कारवाई व्हायला हवी
  • सरकार वाचवण्यासाठी, सरकार जाऊ शकतं असा संशय आल्यानं दुर्लक्ष केलं असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT