सोनाली नवांगुळ sakal
महाराष्ट्र बातम्या

सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: प्रसिद्ध लेखिका सोनाली नवांगुळ यांना ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीसाठी आणि मंजूषा कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार शनिवारी जाहीर झाला आहे. रोख पन्नास हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रसिद्ध तमीळ बंडखोर लेखिका व कवयित्री सलमा यांनी लिहिलेल्या ‘द अवर पास्ट मिडनाईट’ या कादंबरीचा ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ हा अनुवाद असून मनोविकास प्रकाशन संस्थेने ही अनुवादित कादंबरी प्रकाशित केली आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील बंडखोर लेखिकांचा परिचय मराठी साहित्य विश्‍वाला करून देण्यासाठी पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेने कविता महाजन यांच्या संपादकीय मार्गदर्शनाखाली ‘भारतीय लेखिका’ हा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पातूनच ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीची निर्मिती झाली.

प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या मराठीतील आत्मचरित्रात्मक ग्रंथाचा कुलकर्णी यांनी संस्कृतमध्ये ‘प्रकाशमार्ग’ या नावाने अनुवाद केला आहे. प्रा. डॉ. बलवंत जेऊरकर, सूर्यनारायण रणसुभे आणि प्रतिमा इंगोले यांचा परीक्षकांमध्ये समावेश होता.

सलमा यांनी तरुण महिलांच्या भावना, घुसमट आणि त्यांचे बंड परखडपणे मांडले. ‘मनोविकास’ च्या प्रकल्पामुळे ही कादंबरी मराठी वाचकांच्या भेटीला आली आणि साहित्य अकादमीने दखल घेतल्याचा निश्चितच आनंद आहे.

- सोनाली नवांगुळ

मराठी साहित्यकृतीचा संस्कृत भाषेत अनुवाद केलेल्या पुस्तकाला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. या पुरस्काराने मला खूप आनंद झाला आहे. या पुरस्काराने आज सर्वांना संस्कृत भाषेचे महत्त्व कळण्यास मदत होईल.

- प्रा. डॉ. मंजूषा कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT