महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey: शिवसेनेत जे बंड सुरुयं यावरुन शिवसेनेत फुट पडली असे वाटते काय?

राज्यातील राजकारणाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बंड झाले.

युगंधर ताजणे

Maharashtra Political Crisis: राज्यातील राजकारणाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बंड झाले. मात्र यावेळचे बंड हे चर्चेत आले आहे ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे. सकाळ ऑनलाईनच्यावतीनं एक सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये शिवसेनेतील बंडखोरीबाबत वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील पहिला प्रश्न होता शिवसेनेत जे बंड सुरुयं ते यावरुन शिवसेनेत फुट पडेल असे वाटते काय? त्यावर राज्यातील जनतेनं काय उत्तरं दिली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

सर्व्हेतून जे नित्कर्ष समोर आले आहे ते आपण पाहणार आहोत. 43.3 टक्के लोकांनी शिवसेनेत फुट पडेल असे म्हटले आहे. तर 45.6 लोकांनी कुठल्याही प्रकारची फुट पडणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 11.1 टक्के लोकांनी आपल्याला या निर्णयबाबत काहीही सांगता येणार नाही. असे सांगितले आहे. याविषयी अधिक विश्लेषण करताना सकाळ समुहाचे संपादक श्रीराम पवार म्हटले की, हा सर्व्हे शिवसेनेशी संबंधित आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यात जी फुट पडली आहे त्यातील काही प्रश्नांचा विचार करावा लागेल. शिवसेनेचे 2/3 आमदार सोडून गेले आहेत. ही गोष्ट नाकारता येणार नाही. विधिमंडळाच्या नियमांच्या दृष्टीकोनातूनही त्याचा विचार करावा लागेल.

महाराष्ट्र राज्यात सध्या जे काही सुरु आहे त्याची चर्चा देशभर सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणानं वेगळं वळण घेतलं आहे. त्यामध्ये नेमकी कुणाचं सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा (eknath Shinde) अधिक आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये तळ ठोकला आहे. राज्यातल्या यागळ्या विविध घडामोडींवर आधारित एक सर्व्हे सकाळनं केला आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न सर्व्हेतून वाचकांना विचारण्यात आले आहे.

या सर्व्हेच्या माध्यमातून थेट शिवसैनिकांकडून... शिवसैनिकांचे महासर्वेक्षण सकाळ डिजिटलवर आज संध्याकाळी ५ वाजता जाहिर केले गेले आहे. (Sakal online survey) दुसरीकडे बंड पुकारलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे व बंड करणारे आमदार गुवाहाटीतूनच चर्चा करीत आहे. ते अद्याप मुंबईत परतलेले नाही. ते केव्हा येतील याची सर्वजण वाट पाहत आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

SCROLL FOR NEXT