PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru: पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २२० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या सामन्यात बंगळुरूकडून विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी अर्धशतके केली.
Venkatesh Iyer, Virat Kohli, Devdutt Padikkal  | PBKS vs RCB | IPL 2026

Venkatesh Iyer, Virat Kohli, Devdutt Padikkal | PBKS vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, PBKS vs RCB Marathi News: इंडियन प्रीमयर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१७ मे) धरमशाला येथे पंजाब किंग्स आणि रॉयल चलेंजर्स बंगळुरू संघात सामना होत आहे. या सामन्यात बंगळुरूकडून विराट कोहली, देवदत्त पडिक्रल आणि वेंकटेश अय्यर यांनी स्फोटक फलंदाजी केली. त्यामुळे बंगळुरूने पंजाबसमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून जकॉब बेथल आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली.

Venkatesh Iyer, Virat Kohli, Devdutt Padikkal  | PBKS vs RCB | IPL 2026
World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com