Sakal online survey  
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : बंडखोरांना मतदान करणार का, २३ टक्के शिवसैनिकांचा कौल धक्कादायक

सकाळ ऑनलाईन सर्व्हेंमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन काही प्रश्न विचारण्यात आले होते.

युगंधर ताजणे

Maharashtra Political Crisis: सकाळ ऑनलाईन सर्व्हेंमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न होता बंडखोर आमदारांना तुम्ही मतदान करणार का, त्यावर महाराष्ट्रातील जनतेनं काय उत्तर दिलं आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटची कॅबिनेट बैठक घेतली अशी चर्चा सुरु झाल्यानंतर मविआ सरकारला धोक्याची जाणीव झाल्याचे बोलले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु असणाऱ्या राजकीय बंडखोरीची चर्चा वेगवेगळया माध्यमातून समोर आल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आता आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार याविषयी वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहे. सध्या जो मुख्य प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे तो असा की, ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांना पुन्हा मतदान जनता करणार का, त्याचे उत्तर सर्व्हेतून समोर आले आहे. 76.3 टक्के लोकांनी आपण पुन्हा त्या आमदारांना मतदान करणार नसल्याचे सांगितले आहे. तर 12.5 टक्के लोकांनी आपण त्या आमदारांना मतदान करणार असल्याचे सांगितले आहे.

याविषयी प्रतिक्रिया देताना सकाळचे समुह संपादक श्रीराम पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात दोन गट आहे. शिवसेनेतील हा बदल अनेकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. शिवसेनेतील गट हाही अभ्यासाचा विषय आहे. छगन भुजबळ पहिल्यांदा बाहेर पडले होते. शिवसैनिकांचा रोष सर्वांना माहिती आहे. या राज्यामध्ये आता पहिल्यासारखी काही परिस्थिती नाही. आता बंडखोर आमदारांना संरक्षण दिले आहे.

शिवसेनेत जे बंड सुरुयं ते यावरुन शिवसेनेत फुट पडेल असे वाटते काय? त्यावर राज्यातील जनतेनं काय उत्तरं दिली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. या प्रश्नाचे उत्तर 43.3 टक्के लोकांनी शिवसेनेत फुट पडेल असे दिले आहे. तर 45.6 लोकांनी कुठल्याही प्रकारची फुट पडणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 11.1 टक्के लोकांनी आपल्याला या निर्णयबाबत काहीही सांगता येणार नाही. असे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT