महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey: मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला ? 2024 च्या निवडणुकीत शिंदे ,फडणवीस की ठाकरे

राष्ट्रवादीच्या गटाचा सरकारमध्ये समावेश झाला असल्यानं राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळं जनतेचाही मूड बदलला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राष्ट्रवादीच्या गटाचा सरकारमध्ये समावेश झाला असल्यानं राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळं जनतेचाही मूड बदलला आहे. त्यामुळं २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा जनतेला काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समुहानं केला आहे. सकाळनं केलेल्या सर्व्हेमध्ये जनतेनं आपला कौलही दिला आहे. (Sakal Survey 2023 Who will be the CM in 2024 assembly elections of Maharashtra)

सर्व्हेमध्ये किती आणि कोणाचा समावेश?

सकाळनं महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातून ७४,३३० लोकांकडून मतं जाणून घेतली. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश असून नवीन अर्थात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्रीपदासाठीचे संभाव्य उमेदवार

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या राज्यातील दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश सकाळ सर्व्हेच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांच्या यादीत करण्यात आला होता.

जनतेचा कौल काय?

सर्व्हेतून जनतेचा कौल समोर आला आहे. त्यानुसार, कोणत्या उमेदवाराला महाराष्ट्रातील जनतेनं किती टक्के पसंती दिली आहे? जाणून घ्या.

  1. देवेंद्र फडणवीस - २१.९ टक्के

  2. उद्धव ठाकरे - १९.४ टक्के

  3. सांगता येत नाही - १७.७ टक्के

  4. अजित पवार - ९.५ टक्के

  5. एकनाथ शिंदे - ८.५ टक्के

  6. सुप्रिया सुळे - ८.५ टक्के

  7. अशोक चव्हाण - ६.६ टक्के

  8. बाळासाहेब थोरात - ४.२ टक्के

  9. जयंत पाटील - ३.६ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT