Sam TV Number One 
महाराष्ट्र बातम्या

साम टीव्ही ‘नंबर वन’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सकाळ माध्यम समूहाचे साम टीव्ही न्यूज चॅनेल हे मराठीतील सर्व मराठी न्यूज चॅनेल्समध्ये सर्वोत्तम ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३८व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार साम टीव्ही न्यूजने मराठीतील सगळ्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकले आहे. या आठवड्यात २२.३ टक्के प्रेक्षकांची पसंती साम टीव्ही न्यूजला मिळाली आहे. सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांमध्ये साम टीव्ही न्यूज लोकप्रिय असल्याचे बार्कच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.  

मुंबई आणि उपनगरासह ग्रामीण भागातील प्रेक्षकांनीही साम टीव्हीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे. शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात साम टीव्हीच्या निष्पक्ष बातमीपत्रांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बार्कच्या अहवालातून साम टीव्हीच्या याच लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. बातमीमागची बातमी आणि त्यातील सत्य उलगडणं हे साम टीव्हीच्या बातम्यांमधील वेगळेपण आहे. सर्व स्तरांवर याची नोंद प्रामुख्याने घेतली गेली आहे.

साम टीव्ही न्यूजने कायमच राजकीय निष्पक्षपाती आणि लोकाभिमुख बातम्यांना प्राधान्य देत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. व्हायरल सत्य, टॉप ५०, स्पॉटलाइट, मेगा प्राइम टाइम, आज दिनांक, सरकारनामा ३६०, महाराष्ट्र एक्‍स्प्रेस, आज काय विशेष, ३६ जिल्हे ३६ रिपोर्टर यांसारख्या बातमीपत्रांना प्रेक्षकांची सातत्याने पसंती मिळाली आहे. बातम्यांमधील वेगळेपणा आणि सत्याची बाजू मांडत, सकारात्मकतेला दिलेले प्राधान्य यामुळे साम टीव्ही न्यूज चॅनेलने अल्पावधीत लोकप्रियतेची नवनवी शिखरे सर केली आहेत. ‘बार्क’च्या ३८ व्या आठवड्याच्या प्रेक्षकांच्या रेटिंगनुसार एबीपी माझा, झी २४ तास, नेटवर्क १८ लोकमत, टीव्ही ९ सारख्या प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे टाकण्याची किमया साम टीव्ही न्यूजने पुन्हा एकदा साधली आहे. ‘साम’च्या निष्पक्ष बातमीपत्रातूनच ही किमया साधली गेली आहे, असे मत साम टीव्हीचे संपादक नीलेश खरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT