Samata Party claim on Shivsena Uddhav Balasaheb Thackeray party torch symbol political news  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या अडचणी थांबेनात! शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर आता 'मशाल'ही जाणार?

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर देखील समता पक्षाने दावा सांगितला आहे.

रोहित कणसे

शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निराशा व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग तसचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत दिलासा न मिळाल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र येथे देखील शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंच्या अडचणी थांबण्याची चिन्ह नाहीयेत. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर देखील समता पक्षाने दावा सांगितला आहे. त्यामुळे 'धनुष्यबाण' या चिन्हापाठोपाठच आता मशाल हे चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समता पक्षाला मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा दावा समता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. ४ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे.

आजपासून (११ जानेवारी २०२४) ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेत समता पक्षाने सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल हे चिन्ह काढूण घेतले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

"म्हणून वेगळ्या भूमिका साकारण्याकडे कल" प्रियाने स्पष्ट केलं हटके भूमिका साकारण्यामागचं खरं कारण !

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT