Sameer Wankhede_Dhananjay Munde 
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; धनंजय मुंडेंचं सूचक विधान

वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी बनावट जातप्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप केलाय.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : खोट्या जातप्रमाणपत्राच्या कथीत आरोपांमुळं सध्या चर्चेत असलेले नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात जर कोणी तक्रार दिली तर त्यांची चौकशी केली जाईल, असं मुंडे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

“समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल कोणाला आक्षेप असेल आणि त्यानं जर यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार केली तर आम्ही या प्रकरणी चौकशी करु,” असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांच्या या सूचक विधानावरुन वानखेडे यांच्या अडचणीत भविष्यात वाढ होऊ शकते. कारण याप्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही कागदपत्र जाहीर केल्यानंतर त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्ये अनेकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली आहे. नुकतेच प्रा. हरी नरके यांनी देखील याप्रकरणी वानखेडे यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची बॅट पडणार पाकिस्तानला भारी! एका छोट्या शहराची मोठी ओळख! मेरठ कसे बनले जगाचे क्रिकेट बॅट हब?

Mathura Kusum Sarovar : गोवर्धन परिक्रमेतील 'गुप्त खजिना'; कुसुम सरोवराच्या खोलीचे रहस्य आजही कायम! वृंदावन-गोवर्धन फिरताना हे ठिकाण नक्की पहा

E-Pik Pahani: १५ जुलैपासून राज्यभर नियुक्त सहायकांकडून ई-पीक पाहणी; तांत्रिक अडचणी दूर होऊन सातबारा उताऱ्यावरील नोंदी सुलभ

Water Supply : राज्यात बाराशे टँकरद्वारे पाणीपुरवठा

Pune News : पुणे स्थानकावर ९ तासांचा ब्लॉक; पाच जुलैला डेक्कन एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT