महाराष्ट्र बातम्या

Good Morning म्हणत नवाब मलिकांचा समीर वानखेडेंबाबत नवा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

समीर वानखेडे यांचा पहिला निकाह झाला होता. त्यावेळी मेहेर रक्कम किती देण्यात आली होती याबाबतही नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे.

मुंबई - एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेली आरोपांची मालिका अद्याप सुरुच आहे. याआधी वानखेडे यांच्या कारवांयावर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर वानखेडेंनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोपही केला. आता समीर वानखेडे यांनी हिंदु असल्याचा दावा करत असताना मलिकांनी नवा खुलासा केला. ट्विटरवर त्यांनी गूड मॉर्निंग म्हणत समीर वानखेडेंचा पहिला निकाह झाला होता असं म्हटलं आहे.

समीर वानखेडे यांनी याआधी सांगितलं होतं की, शबाना कुरेशीसोबत पहिलं लग्न झालं होतं आणि दोघांचा रितसर घटस्फोटही झाला आहे. दरम्यान, पहिला निकाह झाला होता आणि त्यावेळी मेहेर रक्कम ३३ हजार रुपये देण्यात आली होती असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी याआधी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एक फोटो क्रॉप करून शेअर केला होता. आता मात्र त्यांनी वानखेडेंचा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा पूर्ण फोटो शेअर केला आहे. याला त्यांनी फोटो ऑफ स्वीट कपल असा कॅप्शनही दिला आहे.

निकाहला साक्षीदार म्हणून समीर वानखडेंची बहीण यास्मिन वानखडे यांचे पती अझिज खान होते असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांची पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेत तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, ट्विटर कोर्ट नाही अशा शब्दात नवाब मलिक यांना उत्तर दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्कीला पाहिलंय' साध्वी झालेल्या ममता कुलकर्णींचा दावा, गाईबद्दल बोलताना म्हणाल्या...

Sangli Farmer Death : उसाच्या वाड्याच्या वादातून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : सीटीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी; शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

Anjali Bharti: ‘अनावधानाने शब्द निघाला…’ ; गायिका अंजली भारतींची सोशल मीडियावर माफी, प्रकरण मात्र गंभीर!

Shantilal Suratwala Passed Away : पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन, ७६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

SCROLL FOR NEXT