Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Expressway: इंटिलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे रोखणार 'समृद्धी'वरील अपघात; फडणवीसांनी सांगितली सिस्टिम

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या ८० किमीच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनं शुक्रवारी पार पडलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

शिर्डी : मुंबई ते नागपूर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ८० किमीच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं. यावेळी फडणवीसांनी आपल्या भाषणात या महामार्गावरील अपघातांचं कारण काय? आणि त्यासाठी काय उपयोजना केल्या जात आहेत? याची सविस्तर माहिती दिली. (Samruddhi Expressway accidents to be prevented by intelligent traffic management system Fadnavis said about it)

फडणवीस म्हणाले, "आता या महामार्गावर इंटिलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम इथं तयार होत आहे. पण ती लवकरात लवकर तयार झाली पाहिजे असं मी मोपलवार यांना सांगतो. कारण अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर अपघात या महामार्गावर झाले आहेत. पण आजच्या निमित्तानं मी जनतेला ही विनंती करतो की जरी महामार्ग १५०च्या स्पीडनं डिझाईन केला असला तरी १२०चा वेगाचीच आपल्याला परवानगी आहे. पण आपल्या सगळ्या गाड्या या स्पीडनं चालण्यासाठी लायक नाहीत" (Latest Marathi News)

आपल्याकडील काही गाड्या जुन्या, खराब आहेत. काहींचे टायर खराब झालेत. त्यामुळं दुर्देवानं अपघात होऊ शकतात. त्यामुळं माझी विनंती आहे की, या ठिकाणी स्पीड थोडा कमी ठेवावा. रात्रीच्यावेळी विशेषतः १ ते २ वाजेनंतर आणि पहाटे ५ ते ६ वाजेपर्यंत अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जोपर्यंत इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसत नाही तोपर्यंत लोकांनी वाहनं चालवताना काळजी घ्यावी, असं आवाहनही यावेळी फडणवीस यांनी केलं.

हा मार्ग अनेक किमीपर्यंत सरळ आहे, त्यामुळं ड्रायव्हरला झोप येण्याची शक्यता देखील असते. त्यामुळं लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. शेवटी महामार्ग जरी वेगवान असला तरी आपलं जीवन त्यापेक्षा मुल्यवान आहे. त्यामुळं लोकांनी हे जपलं पाहिजे. मला विश्वास आहे की, एकदा इन्टिलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित झाली की आपण अशा प्राकरच्या अपघातांचा अंदाज व्यक्त करु शकू. त्यांना सांगू शकू की तुमचा स्पीड कमी करा आणि या अपघातापासून लोकांना आपण निश्चितपणे वाचवू शकू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT