politics
politics esakal
महाराष्ट्र

'राऊतजी अलिबागचा हिशोब ईडीला द्यायचाय पण लवकरच...'

सकाळ डिजिटल टीम

'संजय राऊत यांना आमच्या टीकेला उत्तर द्यायला वेळ नसेल, पण...'

काल गुढी पाडव्यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे जनतेला संबोधित केले. यावेळी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, अक्कल दाढ उशिरा येते असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. आता राऊतांच्या या प्रतिक्रियेवर मनसेने जोरदार टीका केली आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी राऊतांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

मनसेचे संदीप देशपांडे म्हणतात, मुंबई महापालिकेत हजारो कोटी रुपये खायचे, अलिबागमध्ये घेतलेल्या जमिनीचा हिशोब ईडीला द्यायचा आहे, त्यामुळे संजय राऊत यांना आमच्या टीकेला उत्तर द्यायला वेळ नसेल, पण लवकरच जनतेला उत्तर द्यावं लागेल, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

काय म्हणालेत संजय राऊत

राज ठाकरेंनी काल शिवजी पार्क येथे मेळाव्याला संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून सरकार आणि मुस्लिमांवर निशाणा साधला होता. त्याला प्रतित्त्युर देताना राऊत म्हणाले, काल मुंबईत मेट्रोसह अनेक उद्घाटनं झाली. लोकार्पण झाली त्यावर बोला, भोंग्याचं काय करायचं त्यासाठी सरकार समर्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी मराठी भाषा भवनचं स्वागत करायला हव होत. त्याविषयी कुणी काही बोलेल नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी जातीयवाद पसरवला या राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावर ते म्हणाले, आपणही शरद पवार यांच्या चरणाशी सल्लामसालत करण्यासाठी जात होता. कशाकरता आपण टोलेबाजी करायची. तुमच्या भाषणाला तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळतात, आणि त्या टाळ्यांनाही प्रायोजक असतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज ठाकरे भाषणात काय म्हणालेत ?

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार पुढे असा सवालही त्यांनी केला. 'तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार,' असे देखील ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT