esakal
महाराष्ट्र बातम्या

तेव्हा राजसाहेबांनी भावाला पण सोडलं नाही...संदीप देशपांडेंचे सेनेला रोखठोक उत्तर

तरुणाचा रोजगार हिरावून घेणारे राज ठाकरेंचे मित्र भाजपवालेच असे म्हणत राज ठाकरेंना शिवसेनेने डिवचण्याचा प्रयत्न केला

धनश्री ओतारी

मुखपत्र सामना अग्रलेखातून वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे- राज ठाकरे यांच्या भेटवरुनही टोलेबाजी केली आहे. तरुणाचा रोजगार हिरावून घेणारे राज ठाकरेंचे मित्र भाजपवालेच आहेत असे म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिवसेनेने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (Sandeep Deshpande Shivsena Mention Raj Thackeray Warns Him About Bjp Over Vedanta Foxconn Project Issue )

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे. अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिवसेनेने डिवचण्याचा प्रयत्न केला.

सेनेच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत पलटवार केला आहे. 'जेंव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो तेंव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही त्यामुळे त्याची चिंता सामना नी करू नये' अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी सेनेला सडेतोड उत्तर दिले आहे.

शिवसेनेचं आजच आंदोलन हे नाटक आहे, ज्यावेळेला मराठी मुलांच्या नोकऱ्या परप्रांतीय हिसकावत होते आणि मनसे महाराष्ट्र भर आंदोलन करत होती, राजसाहेबांना अटक झाली होती त्यावेळेला शिवसेना मूग गिळून गप्प होती. असे ट्विट करत सेनेला त्यांच्या भूमिकेची आठवण करुन दिली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्याने भाजपा मनसे युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळामध्ये जोर धरला असतानाच आता शिवसेनेनं मनसेला भाजपासंदर्भात इशारा दिला आहे.

प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?

फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता.

प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न विचारला होता. “हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं”, असेही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT