crime news esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News : थरार! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आठ गोळ्या झाडून खून; हल्लेखोर फरार

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्लाचा गोळ्या झाडून खून

शैलेश पेटकर-सकाळ वृत्तसेवा

Sangali Crime News : शहरातील वादग्रस्त बाबा ग्रुपचा प्रमुख नालसाब मुल्ला (वय ४१, रा. गुलाब कॉलनी) याचा त्याच्या घरासमोरच गोळ्या झाडून खून करण्यात आला. हल्लेखोरांनी आठ गोळ्या झाडल्या असून त्यातील पाच गोळ्या मुल्ला याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

आज रात्री आठच्या सुमारास माने चौक लगत असणाऱ्या परिसरात ही घटना घडल्याने सांगली पुन्हा हादरली. मोका टोळीतील कुख्यात गुन्हेगार आणि खासगी सावकार मुश्‍ताक मुल्ला याचा तो भाउ होता. मृत नालसाब याच्यावरही मोकातंर्गत कारवाई करण्यात आली होती.

तो सद्या जामिनावर मुक्त होता. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सद्या कार्यरत होता. दरम्यान खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नाही. पूर्वीचा वाद किंवा अन्य कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की नालसाब मुल्ला यांचे शंभर फुटी रस्त्यावर माने चौकापासून काही अंतरावर बाबा चौकात निवासस्थान, कार्यालय व बांधकाम साहित्य विक्रीचा डेपो आहे. आज रात्री आठच्या सुमारास निवासस्थानाबाहेर असलेल्या वाचनालयाजवळ थांबला होता. तेव्हा अंधारात दुचाकीवरून दोघेजण तेथे आले.

क्षणता त्यांनी गोळीबार केला. मुल्ला याच्या छातीवर व पोटावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांच्यासोबत आणखी दोघे असावेत असा संशय आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून मुल्ला याच्या घरातील व परिसरातील नागरिक धावले. तेव्हा मुल्ला गंभीर अवस्थेत होता. त्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT