Parambir Singh Sakal media
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंग बेल्जियममध्ये आहेत, संजय निरुपम यांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) हे सध्या बेल्जियममध्ये आहेत. असा दावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यासोबतच निरुपम यांनी परमबीर सिंग यांना पळून जाण्यास कोणी मदत केली? असा सवालही केला आहे. परमबीर सिंग गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजने (ANI) परमबीर सिंग यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले आहे, मात्र ते अद्याप हजर झाले नाहीत.

परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात देखील आरोप झाले. त्यावरून ठाणे कोर्टाने देखील परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते.

संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आहेत. मंत्र्यावर खंडणी वसूलीचा आरोप होता. तो स्वत: पाच गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड आहे. ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता ते बेल्जियममध्ये आहेत असे समजते. ते बेल्जियमला ​​गेले कसे? त्याला सेफ पॅसेज कोणी दिला? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाहीत?"

परमबीर सिंग हे प्रकृतीच्या कारणास्तव मे महिन्यापासून रजेवर आहेत. परमबीर सिंग यांना त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी अनेक पत्रे पाठवण्यात आली होती आणि त्यांचा ठावठिकाणाविषयी विचारणा करण्यात आली होती, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या महिन्यात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय सेवा (आचार) नियमांच्या तरतुदींचा विचार करत असल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT