sanjay raut sakal media
महाराष्ट्र बातम्या

जगात *** लोकांची कमी नाही, योगींचा व्हिडिओ टाकत राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देऊन आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर यांनी राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता परत संजय राऊतांनी यांनी तोच शब्द कॅप्शनमध्ये लिहित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचा एक व्हिडिओ ट्विट करून विरोधकांना पुन्हा डिवचले आहे.

''एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना राऊतांनी भाजपच्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी एक आक्षेपार्ह शब्द वापरला. स्त्री या नात्याने मला संजय राऊतांचे शब्द लज्जास्पद वाटले. त्यांनी लैंगिक शेरे वापरून आम्हा भाजप पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग करून आमची प्रतिमा मलिन केली आहे'', असे गंभीर आरोप शीतल गंभीर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.

संजय राऊतांचं ट्विट नेमकं काय?

भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर संजय राऊत यांनी तोच शब्द वापरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. जगात ''चू**'' लोकांची कमी नाही. एक शोधायला गेलं तर हजार सापडतील. आता योगींनाच ऐका असं संजय राऊत म्हणाले. त्याचा अर्थ हिंदीमध्ये मूर्ख असा होतो. तुम्ही तुमचा शब्दकोश वाढवा, असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT