महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसला अध्यक्षपद नसल्याचा फायदा भाजप घेतंय - राऊत

सकाळ डिजिटल टीम

देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचा सहभाग आहे. मात्र याला पक्षाला नेतृत्व नसण्याचा फायदा भाजपासारखे पक्ष घेतात.

काँग्रेस पक्ष हा या देशातील सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात या पक्षाने महत्वाची कामगिरी बजावली आहे. देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचा सहभाग आहे. मात्र याला पक्षाला नेतृत्व नसण्याचा फायदा भाजपासारखे पक्ष घेतात, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला. मुंबई येथे पत्रकारांशी ते बोलत होते. काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत सध्याचा गोंधळ कायम राहणार असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी ते म्हणाले, देशाच्या जडणघडणीत काँग्रेसच पक्षाचा मोठा सहभाग आहे. 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी देशावर राज्य केलंय. देशाला अनेक मोठे नेते दिले आहेत. अशावेळी या पक्षाला नेतृत्व नसल्याने याविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. काँग्रेस पक्षाला अध्यक्षपद नाही ते द्यावे अशी मागणी केली तर ते योग्य आहे.

पुढे ते म्हणाले, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाला. एखादा पक्ष नेतृत्वहीन झाला की भाजपासारखे इतर पक्षही त्याचा फायदा घेतात. कॉंग्रेस पक्ष हा या देशातल्या प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राहीला नाही तर भविष्यामध्ये त्यांना राजकारण करता येणार नाही.अशा वेळा काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषयी लवकरात लवकर मार्गी लावला तर नक्कीच त्यातून देशाला आणि विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT