महाराष्ट्र बातम्या

राऊत कुटुंबाचा वाईन उद्योजकांशी करार; सोमय्यांनी दाखवली कागदपत्रे

सकाळ डिजिटल टीम

राऊत कुटुंबियांचे वाईन उद्योजकासोबत करार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

महाराष्ट्रात किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये वाईन बाबतचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान, वाईन म्हणजे दारू नव्हे अशीही वक्तव्ये सरकारमधील नेत्यांनी केली. यावरूनही भाजप नेते किरिट सोमय्या यांनी टीकास्र सोडले. सोमय्या म्हणाले की, याआधीही गांजा म्हणजे हर्बल गांजा, हलका गांजा म्हणत होते. यावेळी वाईन म्हणजे दारू नव्हे म्हणतायत. मग वाईन म्हणजे काय आहे? असा सवालही सोमय्यांनी विचारला.

किरिट सोमय्या आरोप करत नाही तर पुराव्यासह दाखवतोय, आरोप करत नाही असंही सोमय्यांनी म्हटलं. राऊत कुटुंबियांचे वाईन उद्योजकासोबत करार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. याबाबतची काही कागदपत्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली.

संजय राऊत यांच्या कुटुंबाने वाईन उद्योगातील मोठ्या व्यक्तीशी पार्टनरशिप सुरु केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्यांचा उद्योग फक्त पैसे गोळा करणं हाच आहे. महाराष्ट्राला तुम्ही मद्यराष्ट्र केलंत. वाईन व्यावसायिक अशोक गर्ग यांच्याशी पार्टनरशिप कधी केली? त्यांची जॉइंट पार्टनरशिप, कन्या आणि पत्नी किती व्यवसायात आहेत असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.

अशोक गर्ग हे २००६ पासून वाईन उद्योग चालवतात. २०१० मध्ये त्यांनी आणखी एक कंपनीन सुरु केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हा वाईन वितरीत करणं हा आहे. त्यांची या क्षेत्रात मक्तेदारी आहे. १०० कोटींची वार्षिक उलाढाल त्यांची होते. १६ एप्रिल २०२१ रोजी अशोक गर्ग यांच्या ग्रुपशी संजय राऊत यांनी करार केला. त्यांच्या दोन्ही मुली कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या. अशोक गर्ग यांच्याशिवाय कुणीच या कंपनीत पार्टनर नाही. त्याचे आधीचे नाव मादक असं नाव होतं असंही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT