Sanjay Raut
Sanjay Raut esakal
महाराष्ट्र

Sanjay Raut: या चिमण्यांनो परत फिरा... बंडखोरांना संजय राऊतांनी घातली साद

संतोष कानडे

मुंबईः १०३ दिवस जेलमध्ये राहिलेल्या संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या बंडखोरांना साद घातली आहे. बंडखोरी केलेल्या सगळ्यांविषयी मनात ओलावा आहे. काही लोक नक्कीच माघारी फिरणार आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर संजय राऊत बोलत होते. राज ठाकरे, नारायण राणे यांनी पक्ष सोडून शिवसेनेवर टीका केली. परंतु शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. त्याबाबतीमध्ये मी नक्कीच त्यांना मानतो, असं राऊत म्हणाले.

''जे सोडून गेले त्यांना शिवसेनेने कधी काही कमी केलं नाही. पक्षाच्या प्रमुखाला कधीच एकावेळी सर्वांना खूश करता येत नाही. मला ४० वर्षे पक्षाने भरभरुन दिलं. आता जेव्हा पक्षासाठी काही करायची वेळ आली तर मी तुरुंगवासही स्वीकारला. ज्या आमदारांनी बंड केलं. त्यांचीही मजबुरी होती. बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करुन उभी केलेली शिवसेना संपवण्याचा विचार करणं चुकीचं आहे. हा मराठी माणसाचा घात करणारा विचार आहे. गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. काही लोक नक्कीच माघारी फिरतील. आमच्या मनामध्ये सगळ्यांविषयी ओलावा आहे'' असं म्हणत संजय राऊत यांनी एकप्रकारे बंडखोरांना साद घातलीय.

मला तडजोडीची संधी होती- राऊत

मला तडजोडीची संधी होती. परंतु पक्षासाठी मी तुरुंगवास स्वीकारला. बंडखोरांवरही दबाव होता. त्यांना तुरुंगात जायचं नसेल म्हणून ते तिकडे गेले. अनेक जण संपर्कात आहेत, ते सगळं सांगतात. त्यांचं 'मातोश्री'शी भावनिक नातं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनातदेखील सगळ्यांबद्दल प्रेम, ओलावा होता. असं संजय राऊत मुलाखतीदरम्यान म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजांनी सामना आणला खेचून, प्ले ऑफच्या आशा ठेवल्या जिवंत

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT