Sanjay Raut warns Rana couple Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut:"बाई परत लोकसभेत जातील ? त्यांना बजरंग बली धडा शिकवणार.." संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Rana Couple:राणा दांपत्याच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडल्यानंतर संजय राऊत यांनी कडाडून टीका केली.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut warns Rana Couple:सध्या उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी अमरावतीमध्ये कार्यकर्तांची भेट घेतली. यावेळी राणा दांपत्याच्या कार्यकर्तांकडून उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचे बॅनर फाडण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडूनही राणांचे बॅनर फाडण्यात आले. आता रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राणा दांपत्याच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले, यावर माध्यमांनी संजय राऊत यांना प्रश्न केला होता. यावर त्यांनी राणांनी आम्हाला गुंडगिरी शिकवू नये, असे मत मांडले.

संजय राऊत म्हणाले की, "याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. ते आज बॅनर फाडतायं कारण त्यांच्यामागे सत्ता आणि पोलिस आहे. ही गुंडगिरी झुंडगिरी त्यांनी आम्हाला शिकवू नये."

उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या वेळी राणा दांपत्याकडून हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, तरिही हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेणार, अशी भूमिका राणा दांपत्याकडून मांडण्यात आली.(Latest Marathi news)

यावर संजय राऊत म्हणाले की, "हनुमान चालिसाचं पठण त्यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचा फुटलेला गट जो प्रखर हिंदूत्वाचा विरोध करत होता, त्यांच्या कार्यालयासमोर करावं. अमरावतीमध्ये त्यांना परत निवडणूका लढायच्या आहेत. या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही. त्यांना बजरंगबलीच धडा शिकवणार आहेत. हनुमानाच्या नावानं जी नौटंकी केली, त्यावर कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही धडा मिळेल."(Latest Marathi News)

सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर राणा समर्थकांनी फाडले. त्यानंतर ठाकरे समर्थकांकडूनही राणांच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे बॅनर फाडण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT