Sanjay Raut Balasaheb Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

'विठ्ठल विठ्ठल' म्हणत संजय राऊतांनी शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो

शिवसेनेतल्या बंडानंतर बाळासाहेब ठाकरे हेच आमचे बाप आणि उद्धव ठाकरे हेच हायकमांड असा पुनरुच्चार राऊत सातत्याने करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेनेतल्या बंडापासून अधिकच सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. या दरम्यान बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका करणं, शिवसैनिकांना संघटित करण्याचे प्रयत्न करणं यात संजय राऊत आघाडीवर आहेत. ट्वीटच्या माध्यमातूनही ते चर्चेत राहतात. एका नव्या ट्वीटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

संजय राऊत यांनी ट्वीट करत आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचा तसंच बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे कमरेवर हात ठेवून उभे आहेत. हा फोटो ट्वीट करताना त्यांनी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं कॅप्शनही दिलं आहे.

शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यावेळी ते आपली निष्ठा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती असल्याचा पुनरुच्चार सातत्याने करत आहेत. आमचा विठ्ठल एकच तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असाही सूर ते सातत्याने प्रत्येक सभा, माध्यम संवादातून आळवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राऊतांचं हे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT