sanjay raut
sanjay raut esakal
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावरून वर्षा बंगल्यावर राजकीय खलबतं? राऊतांनी दिलं उत्तर

भाग्यश्री राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी', असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार? ही चर्चा राजकीय होती का? अशी चर्चा होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी ते विधान अचानक केलेलं नव्हतं, तर जाणीवपूर्वक केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही वाद पेटलेला नाही. सर्वत्र शांतता आहे. आमच्यामध्ये सर्व आलबेल आहे. पण, कोणाला आनंदाच्या उकाळ्या फुटत असेल तर त्या फुटू द्या. महाविकास आघाडीमध्ये कुठलंही वादळ नाही. पण, आतमध्ये झालेली चर्चा मी बाहेर का सांगू? असं संजय राऊत म्हणाले.

अनेक माजी सहकारी आहेत, त्यांना भावी सहकारी व्हायचे आहे. रावसाहेब दानवे हे केंद्रातील नेते आहेत. पण, महाराष्ट्रातील अनेक नेते आमच्याकडे यायला उत्सुक आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचक इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. पण, युतीबाबत कुठलाही विचार नाही. आम्ही २५ वर्ष महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहोत, असेही राऊत म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम पार पडले. एका कार्यक्रमावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील मंचावर उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'आजी माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असा उल्लेख केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. तसेच महाविकास आघाडीत काही नेते नाराज असल्याचीही माहिती होती. आज सकाळीच संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT