Sanjay Raut said, lets keep Balasahebs Shiv Sena alive Sanjay Raut said, lets keep Balasahebs Shiv Sena alive
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : "विरोधकांचं ऐक्य होणार नाही हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम; ४८ पैकी ४० जागा जिंकणार"

२०२४ च्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकत्र येण्याची सुरुवात झालीय, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

विरोधी पक्षांचं ऐक्य होणार नाही, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम लवकरच तुटून पडेल आणि लोकसभा निवडणुकीत विरोधक ४८ पैकी ४० जागा जिंकतील, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष एकत्र येण्याला सुरुवात झाली ही आशादायी गोष्ट आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष असे सगळे एकत्र यायला सुरुवात झालीय, ही आशादायी गोष्ट आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार - तेजस्वी यादव यांची बैठक झाली. ते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंना भेटले. काल शरद पवार राहुल गांधी आणि खर्गेंना भेटले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटले. आज मला कळलं की राहुल गांधी ममता बॅनर्जींनाही भेटणार आहेत."

"सगळ्या प्रमुख विरोधी पक्षांना भेटून एकत्र येण्यासाठी राहुल गांधी काम करत आहेत. आम्हीही त्यांच्या सोबत आहोत. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत चर्चा झाली. तेव्हा मी सांगितलं त्यांना की महाराष्ट्रात या. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ४८ पैकी ४० जागा जिंकू. विरोधी पक्षांचं ऐक्य होणार नाही, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम तुटून पडेल. २०२४ मध्ये सत्तापरिवर्तन नक्कीच होईल", असंही संजय राऊत पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT