Eknath Shinde Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut :"मला जेलमध्ये जायचं नाहीये, युती तोडा असं एकनाथ शिंदे म्हणाले"

एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, असं काल आदित्य ठाकरे म्हणाले होते.

वैष्णवी कारंजकर

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन अक्षरशः रडले, असा दावा त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारलं असंही ते म्हणाले. याला आता संजय राऊतांनी पुष्टी केली आहे.

माध्यमांशी बोलताना आज संजय राऊत म्हणाले, "आदित्य ठाकरे बोलले ते खरं आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले आणि म्हणाले की मला जेलमध्ये जायचं नाहीये. तुम्ही काहीतरी करा. ही युती तुम्ही तोडा. आम्ही म्हणालो त्यांना की तुम्ही का जाल जेलमध्ये? तुम्हाला पक्षाने काहीतरी दिलंय, तर तुम्ही पक्षासोबत राहायला हवं."

"भाजपाचं हे दबावतंत्र आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. तरीही ते म्हणत होते की मला भीती वाटतेय, मला जेलमध्ये जावं लागेल. ती भीती त्यांच्यासोबत जाणाऱ्या सगळ्यांना होती. त्या सगळ्यांची नावं तुम्हाला माहित आहेत. त्याच लोकांचं नेतृत्व एकनाथ शिंदेंनी केलं", असंही संजय राऊत पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT