Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: "राज्यात सध्या सुपारीचं काम सुरु"; राऊतांनी पत्रकार परिषदेत थेट फोटोच दाखवले

पत्रकार परिषदेत दाखवलेल्या फोटोंमध्ये कोण होतं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात सध्या सुपाऱ्या देऊन काम करुन घेण्याचे प्रकार वाढले आहेत. हे काम दिल्लीतून होत आहे. मातोश्रीबाहेर जे आंदोलन झालं ते देखील सुपारी देऊन पाठवलेले लोक होते, असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. इतकंच नव्हे तर या आंदोलनामध्ये असलेले लोक हे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले होते, अशा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे फोटोच त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.

Sanjay Raut

राऊत म्हणाले, मातोश्रीबाहेर 10 ते 12 लोक आले होते, त्यांना कोणी पाठवलं होतं, ती सुपारी कोणाची होती याचे सर्व पुरावे माझ्याकडं आहेत. आमच्या विरोधात नारेबाजी करणारे लोक वर्षावर राहणारे होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं होतं.

Sanjay Raut

थेट फोटोच दाखवले

दरम्यान, संजय राऊत यांनी काही फोटो देखील सादर केले यामध्ये अकबर सय्यद, सलमान शेख अफराफ सिद्धिकी, अक्रम शेख या लोकांचे फोटो सादर केले. हे लोक मातोश्री बाहेर आंदोलन करणाऱ्या लोकांचे फोटो आहेत. यांचे फोटो ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, मिसेस मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते.

Sanjay Raut

सुपारी गँगला महाराष्ट्रातील वातावरण बिघडवलं

यावरुन आक्रमक पवित्रा घेत संजय राऊत म्हणाले, ही सुपारी गँग वर्षामध्ये आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनबाहेर झालेल्या आंदोलनातील लोक देखील सुपारी दिलेले लोक होते. वक्फ बोर्डाचं विधेयक हे जेपीसीकडं चर्चेसाठी गेलेलं आहे. चर्चा होईल पण त्याअगोदर मुंबई आणि महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी काही मुस्लिम व्यक्तींना मातोश्रीवर आंदोलनासाठी पाठवण्यात आलं होतं. मातोश्रीच्या बाहेर आंदोलन केलेले सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत आहेत.

Sanjay Raut

ठाण्यातील ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावर भाष्य

काळोखात ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला त्यातले एकही ठाण्यातील नव्हते. सुपारी देऊन आणलेले लोक होते. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही हे करता आहात. 2 महिन्यांत सत्ता आमच्याकडं यईल, असा दावाही यावेळी संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT