Sanjay Raut sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा ;संजय राऊत,निवडणूक आयोग हा ‘अंधा कानून’

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीच जिंकणार, असा ठाम विश्वास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला असून पंतप्रधानपदासाठी संपूर्ण देशाची निवड राहुल गांधी असून आम्ही सर्व राहुल गांधींबरोबर आहोत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीच जिंकणार, असा ठाम विश्वास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला असून पंतप्रधानपदासाठी संपूर्ण देशाची निवड राहुल गांधी असून आम्ही सर्व राहुल गांधींबरोबर आहोत, असे त्यांनी सांगितले.

गेले काही दिवस परदेशात गेलेले संजय राऊत शनिवारी मुंबईत परतले. माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीत ''इंडिया'' आघडीचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘४ जूनला दुपारी बारानंतर ‘इंडिया’ आघाडी जिंकतेय हे सर्वांना दिसेल. पंतप्रधान ‘इंडिया’ आघाडीचा असेल.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, त्यांची निवड राहुल गांधी आहेत. मात्र संपूर्ण देशाची निवड राहुल गांधी आहेत. आम्ही सगळे राहुल गांधींबरोबर आहोत. राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे देशभर फिरून मेहनत घेतली आहे. या निवडणुकीत विरोधकांच्या चिंधड्या उडवल्या आहेत, ते पाहता राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यात सक्षम असल्याचे देशवासीयांनी स्वीकारला आहे.’’

‘‘निवडणूक आयोगाला हाताशी पकडून स्वतःच्या सोयीच्या तारखा पंतप्रधानांनी घेतल्या. पंतप्रधानांनी शेवटच्या टप्प्यात त्यांचे मतदान घेतले. सेलिब्रिटीही त्यात आले. निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही तर राजकारणातल्या सेलिब्रिटींची सोय बघतो. हे सत्य आहे,’’ अशी टीका राऊत यांनी केली.

योग साधनेचा अपमान’

कन्याकुमारीतील मोदी यांच्या ध्यानधारणेवर टीका करताना राऊत म्हणाले की, चहूबाजूंनी कॅमेरे लावून एक माणूस ध्यानमग्न होतो, हा आपल्या योग साधनेचा अपमान आहे. निवडणूक आयोग हे सर्व बघत आहे. पण निवडणूक आयोगाचा हा ‘अंधा कानून’ आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT