Sanjay Raut on Rebel MLA's
Sanjay Raut on Rebel MLA's esakal
महाराष्ट्र

काळजी करू नका; शरद पवार, ममता बॅनर्जींना टॅग करत संजय राऊतांचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

राज्यात हायव्होल्टेज राजकीय ड्रामा सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. मात्र सत्तानाट्याच्या खेळाचा एक अंक सुरू असल्याने संजय राऊत चौकशीसाठी गेलेले नव्हते. मात्र आता त्यांनी याचविषयी एक ट्वीट करत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना टॅग केलं आहे. (Sanjay Raut News)

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात की, मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला जारी करण्यात आलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो. काळजी करू नका म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि शरद पवारांनाही(Sharad Pawar) ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स बजावलं आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. मात्र, अलिबागमधल्या त्यांच्या सभेमुळे संजय राऊत चौकशीला गेले नव्हते. आता ईडीने त्यांना दुसरं समन्स बजावत १ जुलैला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT