Sharad Pawar & Sanjay Raut
Sharad Pawar & Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर येताच राऊत घेणार राजकीय किंगमेकर शरद पवारांची भेट

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाला आहे. काल संध्याकाळी ते कोठडीतून बाहेर आले. आज संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट घेणार आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊत यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे. आज संजय राऊत मातोश्रीवर आणि सिल्व्हर ओक वरती ते जाणार आहेत. आज राऊत या दोन्ही नेत्यांची भेट घेणार घेणार आहेत. यावेळी महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राऊत यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

आज सकाळी साडे अकरा वाजता संजय राऊत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राऊत सिल्व्हर ओक वरती जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज या भेटीमद्धे काय चर्चा होणार याकडे राज्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. दरम्यान संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर ते मातोश्रीवर जाऊन भेट घेणार होते परंतु कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी यामुळे काल भेट रद्द झाली. दरम्यान आज ते आज 11.30 वाजता राऊत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

अशातच काल घरी आल्यानंतर बोलताना राऊत म्हणाले की, मी 102 दिवस जेलमध्ये राहिलो पण आता मी 102 आमदार निवडून आणून दाखवेन. दरम्यान संजय राऊत बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीमद्धे आनंद व्यक्त होत आहे. राऊत यांच्या परत येण्यामुळे महाविकास आघाडीला भरारी मिळेल अशा चर्चाना सुरू झाल्या आहेत.

संजय राऊत यांनी बोलताना भाजप आणि ईडीवरती हल्लाबोल केला आहे. आता त्यांना कळेल की मला अटक करुन किती मोठी चूक केली. देशाची राजकारणातील सर्वात मोठी चूक असेल की संजय राऊतांना अटक केली. आज न्यायालयाने सांगितलं की, संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. हे न्यायालयाने सांगितल्यावर ते हायकोर्टात पळत गेले. पण पळू द्या. मला किती वेळाही अटक करा. मी शिवसेनेपासून दूर जाणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलोय”, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत कडाडले. संजय राऊत त्यांच्या भांडूप येथील घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT