महाराष्ट्र बातम्या

Video : ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! सरपंच पेरे पाटलांचा संदेश वाचा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून त्यासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. त्यानंतर 15 जानेवारीस प्रत्यक्ष मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पैसा कमविण्याचा अड्डा असा काहीसा विचार सध्या फाेफावू लागला आहे. त्याअनुषंगाने गावच्या विकासासाठी ज्यांना तळमळीने काम करायचे आहे त्यांनीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवावेत असा संदेश पाटाेदाचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी दिला आहे. पेरे पाटील यांच्या आवाहनाचा व्हिडिआे माेठ्या प्रमाणात समाजमाध्यमात फिरत आहे.

पेरे पाटील म्हणात, दोन दिवसांची निवडणूक असते पण पाच वर्षे आपल्याला सर्वांना भोगावे लागते. या निमित्ताने मला मुद्दाम एक सांगावेसे वाटते. प्रत्येक गावची 70 वर्षे आपली फुकट गेलेली आहे. त्यात लाेकांच्या डाेक्यात भ्रष्टाचार, पैसे कमविणे हे डाेक्यात ठेऊन तुम्ही निवडणुका लढविणार असाल तर ते अतिशय वाईट आहे असे मला वाटते. ज्याला वेळ आहे. ज्याच्याकडे कुवत आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे आपल्या गावाचे काही तरी चांगले करायची ताकद आहे अशाच लोकांनी या क्षेत्रात आले पाहिजे. हौशा गवश्‍यांनी या क्षेत्रात येऊ नये आणि गावाचा नाश करु नये अशी महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून सरपंच पेरे पाटील यांनी कळकळीची विनंती केली आहे. 

निवडणूकांसाठी आम्ही सज्ज आहाेतच, पुढचं आदेशावर ठरवू; महाविकासच्या नेत्यांची भुमिका

पेरे पाटील पुढे म्हणतात, ग्रामपंचायत सदस्य होणे सोपे आहे पण काम करणे खूप अवघड आहे. त्याला अभ्यास पाहिजे. मी 25 वर्षे रात्रं दिवस काम करीत आहे पण आजही मला अर्धी ग्रामपंचायत कळलेली नाही. ज्याला फूल टाईम द्यायचा आहे. ज्याच्याकडे सगळ्या गाेष्टी आहेत. करायची इच्छा आहे. समाजसेवेची आवड आहे अशा लोकांनी यात आले पाहिजे. भाऊ बंदकी किंवा दूस-याचा राग काढायचा म्हणून या क्षेत्राची निवड करणे हे अतिशय वाईट आहे. मी निवडून आल्यावर पैसे खाईन ही भावना अतिशय चूकीची आहे. पैसा कमवायला पाहिजे माणसांनी, उत्तम व्यावहार्य जाेडूनीया धन असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. इथं निवडून आल्यावर पैसा कमवू ही भावना अतिश्‍य वाईट आहे. वाईट शब्दांत बाेलायचे झाले तर बायकोतला आणि बहिणीतला फरक कळत नसेल तर आपल्या गावाचा आणि राज्याच्या वाईट दिशेने आपण चाललो आहे हे निश्‍चित आहे. हे क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे. एक पवित्र मंदिर आहे. पवित्र काम आहे, इथं पवित्र भावनाने इथं या आणि आपआपल्या गावाचा विकास करा असेही पेरे- पाटील यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

सोलापूर पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरात डीजे अन्‌ लेझर लाईट्सवर बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार 'बीएनएस' २०२३ मधील कलम १६३ नुसार कारवाई, वाचा...

Prashant Kishor: बंगला बदलल्याने नशीब बदललं? प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांचा गड कसा केला उद्ध्वस्त?

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

पोलिस अधीक्षक म्हणाले..! आता अडचणीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामकची मदत एकाच कॉलवर; महिला, विद्यार्थी व एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी ‘हे’ ॲप, वाचा...

SCROLL FOR NEXT