महिला सरपंच sakal
महाराष्ट्र बातम्या

सरपंचांची निवड आता जनतेतून! सोलापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची मंगळवारी आरक्षण सोडत; २०३० पर्यंतचे चित्र होणार स्पष्ट

लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्याही निवडणुका झाल्या, गावातील निवडणुका मात्र ठप्प झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत मंगळवारी (ता. २२) दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्याही निवडणुका झाल्या, गावातील निवडणुका मात्र ठप्प झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत मंगळवारी (ता. २२) दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. या सोडतीनंतर गावातील पुढचे कारभारी कोण- कोण असू शकतात? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सन 2025 ते सन 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत. सदर नियमान्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रीयांसह) सरपंचपदे निश्चित केली जाणार आहेत. ही प्रक्रिया त्या- त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या प्रमुख उपस्थितीत राबविली जाणार आहे. गावांच्या राजकारणाला निर्णायक वळण देणाऱ्या या सरपंच आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे. सरपंचांची निवड आता जनतेतून होत असल्याने या आरक्षण सोडतीला अधिक महत्त्व आले आहे.

आकडे बोलतात...

  • जिल्ह्यातील एकूण सरपंच : १०२५

  • जिल्ह्यातील एकूण अनुसूचित जातीचे सरपंच : १५५ (महिला ७८ व पुरुष ७७)

  • जिल्ह्यातील एकूण अनुसूचित जमातीचे सरपंच : १८ (महिला ९ व पुरुष ९)

  • जिल्ह्यातील एकूण ओबीसी सरपंच : २७७ (महिला १३९ व पुरुष १३८)

  • जिल्ह्यातील सर्वसाधारण सरपंच : ५७५ (महिला २८८ व पुरुष २८७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT