School esakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार : शिक्षणमंत्री

लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल, असे मत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी व्यक्त केले आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर आढावा घेऊन शाळांबाबत (School reopening) 4 ते 5 दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. लहान मुलांचे लसीकरण (Children Vaccination) सुरू व्हावे अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे येत्या 15 डिसेंबरपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई, पुण्यात (Mumbai-Pune) 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. टास्क फोर्ससोबत (Task force) चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र, लहान मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण सुरु व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दक्षिण अफ्रिकेत (South Africa) आढळलेला कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्रातदेखील पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्यासह देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्यात येत्या 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार होत्या. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे प्रशासनातर्फे प्रत्येक पाऊल सावधतेने टाकले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT