School Reopen Updates in Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू? मुख्यमंत्र्यांचा लवकरच निर्णय

ओमकार वाबळे

कोरोनाची तिसरी लाट धुमाकूळ घालत असताना राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत. दरम्यान, राज्यातील शाळा महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडे विचाराधीन असलेल्या प्रस्तावावर निर्णय येणार आहे. (Schools Reopen in Maharashtra)

आता कोरोनाची लाट ओसरत असल्याची आकडेवारी मागील 4 दिवसांपासून समोर येत असल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. याआधी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू व्हाव्या असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं होतं.

मागील 20 दिवसांपासून बंद असलेले वर्ग पुन्हा भरवण्याला आता हिरवा कंदील मिळणार आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीआधी ऑफलाईन वर्ग सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, राज्याच्या शिक्षण विभागाने मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. येणाऱ्या काळात सुधारणाऱ्या परिस्थितीनुसार माध्यमिक शाळा आणि कॉलेज सुरू करणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहले आहे. स्थानिक परिस्थिती हाताळून आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने यावर नियंत्रण ठेवण्यात यावं, असं त्यांनी सुचवलं आहे. यावर मंत्री वर्षा गायकवाड यांनीही अनुकूलता दर्शवली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आल्याचं समोर येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT