Maharashtra
Maharashtra Sakal
महाराष्ट्र

Maharashtra Din : नदीत रोषणाई, कैद्यांची सुटका; १ मे १९६० रोजी काय घडलं होतं?

वैष्णवी कारंजकर

आज महाराष्ट्र दिन. ६३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संयुक्त महाराष्ट्र झाला. या दिवशी नक्की काय काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही ६३ वर्षांपूर्वीचा पेपर चाळला. आणि अनेक गोष्टी आढळल्या.

१ मे १९६० रोजी अखेर महाराष्ट्र हे नवं राज्य अस्तित्वात आलं. या दिवशी प्रकाशित कऱण्यात आलेला सकाळ आमच्या संग्रहातून आम्ही वाचकांपुढे आणत आहोत. या दिवशी नक्की काय काय घडलं होतं, जाणून घ्या या पेपरमधून...

भारताच्या राजकीय नकाशात महाराष्ट्र व गुजरात या दोन नव्या प्रांतांचा उदय

मध्यरात्री बारा वाजता तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मध्यरात्री १२ वाजता महाराष्ट्र प्रांताचा नकाशा प्रकाशित केला आणि उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं, असा उल्लेख या दिवशीच्या सकाळच्या अंकात आहे. तसंच गुजरातचंही उद्घाटन यावेळी नेहरुंनी केलं.

Maharashtra Din

पुण्यात मिरवणूक, नदीत रोषणाई

महाराष्ट्राच्या स्थापनेच्या निमित्ताने रात्री पुणे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी संभाजीपासून नव्या पुलापर्यंत पुणे महापालिकेतर्फे नदीत एक हजार दिवे सोडण्यात आले. शनिवारवाड्यावर मिरवणूक पोहोचली आणि दारूकाम झालं. ही मिरवणूक अर्धा मैल लांबीची असल्याचं सकाळच्या अंकात म्हटलं आहे.

गरीबांना अन्नदान

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या निमित्ताने मध्यरात्रीपर्यंत विविध समाज आणि संस्थांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी गोरगरिबांना अन्नदानही करण्यात आलं. पानसुपारी, करमणुकीचेही कार्यक्रम झाले.

साडेचारशे कैद्यांची मुक्तता

आनंदोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून साडेचारशे कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती. मात्र खुनाची शिक्षा झालेल्या कोणत्याही कैद्याची शिक्षा कमी कऱण्यात आली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT