solapur zp ceo manisha awhale  sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा परिषदेच्या 175 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग! झेडपी शाळांची यंदा वाढली पटसंख्या; जिल्ह्यातील 30,255 विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीत प्रवेश

चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ३१ हजार ६४४ इतक्या दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ३० हजार २५५ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आहे. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या बळावर शिक्षकांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ३१ हजार ६४४ इतक्या दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ३० हजार २५५ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आहे. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या बळावर शिक्षकांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविली आहे.

जिल्ह्यात मराठी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या दोन हजार ७७७ शाळा आहेत. २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेस १० टक्के पट वाढविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षात आठ जुलैअखेर ३० हजार २५५ विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेतला आहे. यात सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस तालुक्यात चांगली कामगिरी झाली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा पट वाढवा’ हे अभियान राबविले होते. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत दहा विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचेही उद्दिष्ट देण्यात आले होते. कारण, २०२२- २३ मध्ये जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या एक लाख ९७ हजार ६३१ वरून २०२३- २४ मध्ये एक लाख ९० हजार ८८ इतकी झाली होती. आता शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठीही अभियान राबविण्यात येत आहे. पटसंख्या वाढ व शाळाबाह्य मुलांच्या शोध अभियानानंतर पटसंख्येत आणखी वाढ होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

तालुकानिहाय पहिलीत दाखल विद्यार्थी

तालुका प्रवेशित विद्यार्थी

  • अक्कलकोट २,९१०

  • बार्शी २,०१२

  • करमाळा २,१३८

  • माढा २,८८९

  • माळशिरस ३,४३४

  • मंगळवेढा २,३१२

  • मोहोळ ३,१४०

  • पंढरपूर ३,५६६

  • सांगोला ३,३२९

  • उत्तर सोलापूर १,३७५

  • दक्षिण सोलापूर ३,१५०

  • एकूण ३०,२५५

शाळांमध्ये आतागुणवत्तेवर भर

जिल्हा परिषदेच्या १७५ शाळांमध्ये यंदा पहिल्यांदाच सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर, विविध उपक्रम राबविणे, शिक्षक भरती व शाळांना समान प्रमाणात शिक्षक, अशा नियोजनामुळे इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी यंदा वाढले आहेत. यात सर्व शिक्षकांसह प्राथमिक शिक्षणमधील अधिकाऱ्यांनीही चांगले काम केले आहे.

- मनीषा आव्हाळे, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर

यंदा सेमी इंग्रजीचे वर्ग व गुणवत्तेवर भर

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पालक व विद्यार्थ्यांचा कल ओळखून जिल्हा परिषदेच्या १७५ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. आता केवळ गुणवत्तेवरच भर, अशी त्यांची भूमिका आहे. त्यानुसार त्यांनी ‘डायट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे पेपरही तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे पालकांनाही विश्वास वाटू लागला की, आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगले दर्जेदार शिक्षण मिळेल. त्यामुळे पटसंख्या वाढल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT